अधिकाधिक विकासकामांचा समावेश करा; परिपूर्ण आराखडा सादर करा जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश




 

 

अधिकाधिक विकासकामांचा समावेश करा; परिपूर्ण आराखडा सादर करा

जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश

अकोला, दि. 9 : जिल्ह्यात 2026-27 मधील अपेक्षित कामांबाबत आराखडा अनेक कार्यालयांकडून अद्यापही प्राप्त नाही. आवश्यक, तसेच दीर्घकालीन विकास डोळ्यांसमोर ठेवून अधिकाधिक कामांचा समावेश व्हावा व परिपूर्ण आराखडा तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

 

जिल्हा वार्षिक योजना आराखडा, यापूर्वीच्या कामांवर झालेला खर्च, प्रगतीतील कामे आदी विविध विषयांचा आढावा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत महसूल सभागृहातील बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, कामांची आवश्यकता व दीर्घकालीन विकास, उपयुक्तता आदी बाबी लक्षात घेऊन परिपूर्ण आराखडा सर्व विभागांनी तत्काळ सादर करावा. यापूर्वीच्या कामांची प्रगती, पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग छायाचित्रे सादर करण्यात यावे.

प्रगतीपथावर जी कामे सुरू आहेत, ती वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. स्पिल निधीच्या मागण्या सर्व यंत्रणांनी तत्काळ करणे आवश्यक आहे. कुठलाही निधी अखर्चित राहता कामा नये. जिल्ह्यात जास्तीत जास्त विकासकामे होणे आवश्यक आहे. कामे अपूर्ण राहणे, निधी अखर्चित राहणे असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पशुसंवर्धन, मृद व जलसंधारण, महावितरण यासह विविध विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा