खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण ‘अमृत’चा उपक्रम

 खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण

‘अमृत’चा उपक्रम

अकोला, दि. १ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे (अमृत) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण शिबिराद्वारे दिले जाणार आहे.

 

खुल्या गटामधील ब्राह्मण, बनिया, वत्स, कम्मा, कायस्थ, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, मारवाडी, येलमार, त्यागी, गुजराथी, सेनगुनथर, सिंधी, नायडू, राजपूत, कोमटी या अमृत लक्षित गटातील ४० युवक व युवती उमेदवारांचे विनामूल्य २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. ७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान होईल.

त्यात उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय गुण व संपदा, सुसंवाद कला, सरकारी कर्ज आणि अनुदान योजना, बँकेची कार्यप्रणाली, उद्योग उभारणी व उद्योग व्यवस्थापन, अभिप्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम, विक्री कला, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल, यशस्वी उद्योजकाचे मनोगत, उद्योगांना भेटी, विविध क्षेत्रातील संधी, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाची कर्ज प्रकरणे आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी किमान ८ वी उत्तीर्ण, आधारपत्र, पॅनकार्ड, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, ८ लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला, वयोमर्यादा १८ वर्ष आवश्यक. त्यानुसार युवक व युवती उमेदवारांनी दि. ५ जानेवारी रोजी दु. ४ वा. पूर्वी चेतन टिपरे, (मो. नं. ८८०५४७७४६५), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, शुक्ल सदन, दुर्गा चौक, अकोला येथे कागदपत्रांसह अर्ज करावा. त्यानंतर त्यांची मुलाखत घेऊन प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येईल.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमानंतर त्याचा उद्योग सुरु करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी व महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचे जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुळकर्णी यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा