वीर वैभव लहाने यांना मानवंदना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार




 वीर वैभव लहाने यांना मानवंदनाशासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अकोला दि ९: देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारतसैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले.
ते १२ मराठा लाइट इन्फंट्री यायुनिटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर येथे सैनिकी व शासकीय इतमामातत्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहिद लहाने हे जम्मू काश्मिरमध्ये कुपवाडा सेक्टरमध्ये कार्यरत होते.प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कुणाल झाल्टे, मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे सीएचएम रामेश्वरपाटील, वैभव लहाने यांच्या कुटुंबियांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी सैनिकी विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पोलीस विभागाच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. जारो नागरिक वीर वैभव लहाने यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. ‘भारत माता की जय’ शहिद जवान अमर रहे अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी वीर लहाने यांना श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा