जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीची बैठक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिग्नल प्रणालीत सुधारणा करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला,दि २: शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता अद्ययावत सिग्नल प्रणाली कार्यान्वित करणे, सिग्नलच्या योग्य वेळा निर्धारित करणे तसेच अनावश्यक गतिरोधक काढून टाकण्याचे निर्देश रस्ते सुरक्षा समिती बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत रस्ते सुरक्षा समितीची बैठक महसूल सभागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक मनोज बहुरे,मनपा शहर अभियंता नीला वंजारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत वाहतूक व पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. अधिकृत वाहनतळांची पाहणी करावी आणि त्याच ठिकाणी पार्किंग होईल, अशी व्यवस्था करावी. शिवणी विमानतळासमोरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले.



.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा