श्रीमती रादेगो महिला महाविद्यालयात गुरुवारी 'बोलींचा जागर'
श्रीमती रादेगो महिला महाविद्यालयात गुरुवारी 'बोलींचा जागर'
अकोला, दि. २१ : स्थानिक श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात गुरूवारी 'बोलींचा जागर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषेच्या विविध बोलींचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने तथा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्रातील विविध 36 जिल्ह्यांमध्ये विद्यापीठस्तर आणि महाविद्यालयस्तरावर 'बोलींचा जागर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, जि. अमरावती आणि श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 'बोलींचा जागर' या कार्यक्रमाचे आयोजन गुरूवार, दि.22 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या दरम्यान करण्यात आले आहे.
'बोलींचा जागर' या कार्यक्रमांतर्गत सकाळी 9 ते 10 शोभायात्रा/ग्रंथदिंडी आणि सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मुख्य कार्यक्रम अशा दोन सत्रात करण्यात आले आहे.
'बोलींचा जागर या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण लोककलांचे सादरीकरण, संवाद, बोली भाषा अभ्यासकांचे व तज्ञांचे मार्गदर्शन राहणार आहे.
या कार्यक्रमात पारधी आणि कलारी या मराठी बोली भाषांचे भाषातज्ञ प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. यात मा. प्रकाश चव्हाण, मा.डॉ.रामदास चवरे आणि मा. प्रा. भगवान डोहळे या भाषातज्ञांचा सहभाग राहणार आहे.
या कार्यक्रमाचे राज्यस्तरावर निमंत्रक म्हणून मा.डॉ.उदय सामंत, मंत्री मराठी भाषा व उद्योग आणि मा.डॉ.किरण कुलकर्णी, सचिव, मराठी भाषा विभाग हे आहेत.
तर रादेगो महाविद्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाचे निमंत्रक प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले, प्राचार्य, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला आणि मा. अरुण गिते, भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य हे आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.अविनाश आवलगावकर, कुलगुरु, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर अमरावती हे भूषविणार असून भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष मा. दिलीपराज गोयनका आणि रादेगो महिला महाद्यालयाच्या प्राचार्य डॉ.चारूशिला रूमाले यांची विशेष उपस्थिती राहील.
कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक मा. संतोष गोसावी, सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई (म.रा.) तर समन्वयक डॉ.स्वप्नील इंगोले, मराठी विभागप्रमुख, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला हे आहेत.
तरी 'बोलींचा जागर' या कार्यक्रमाचा लाभ मराठी बोली भाषा प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन रादेगो महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारूशिला रूमाले यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा