शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नाव शोधण्यासाठी ऑनलाईन सुविधा

 

 

शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

नाव शोधण्यासाठी ऑनलाईन सुविधा

अकोला दि. 16 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय व तहसील कार्यालय स्तरावर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. मतदार नोंदी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी दि. 3 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय व तहसील कार्यालय स्तरावर करण्यात आली आहे.

पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी http://ceoelection.maharashtra.gov.in/ConstituencyRolls/TandGElectorallsSimple.aspx या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन