विभागीय स्नेहसंमेलनाचा उत्साहात शुभारंभ
निवासी शाळांतील विद्यार्थ्यांच्या
विभागीय
स्नेहसंमेलनाचा उत्साहात
शुभारंभ
अकोला, दि. ३० : सामाजिक न्याय
विभागातर्फे शासकीय निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांचे विभागीय स्नेहसंमेलन, क्रीडा
व सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहात जिल्हा क्रीडा संकुल येथे आज झाला.
समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त
माया केदार यांच्या हस्ते पथसंचलनाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी
अमरावती विभागातील सहाय्यक आयुक्त मारुती वाठ, श्रीमती मंगला मून, श्री. मेरथ,श्री.चव्हाण,
श्रीमती बोबडे आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुल येथे होत
असलेल्या या विभागीय स्नेहसंमेलनात अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यांतील २६ निवासी
शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा
स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक मैदानी खेळांचा समावेश आहे. निवासी शाळांतील कला,
क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी हा महोत्सव आयोजिण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या
सर्वांगीण विकासासाठी संमेलन उपयुक्त ठरेल, असे मनोगत विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त
केले.
०००

.jpeg)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा