श्री गुरू तेग बहादूर यांचे 350 वे शहिदी समागम वर्ष जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम > चित्ररथातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या जीवनकार्यावर प्रकाश

 



श्री गुरू तेग बहादूर यांचे 350 वे शहिदी समागम वर्ष

जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम

> चित्ररथातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या जीवनकार्यावर प्रकाश


अकोला, दि. 2 हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे भव्य कार्यक्रम होणार असून, अकोला जिल्ह्यातून शेकडो भाविक जाणार आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येत असून, चित्ररथाद्वारे विविध ठिकाणांना भेट देऊन साहिबजींच्या जीवनकार्याची माहिती देण्यात येत आहे.

 


जिल्ह्यातील सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी समाजबांधवांची अधिक लोकसंख्या असलेल्या भागासह संपुर्ण जिल्ह्यात हा चित्ररथ फिरत असून साहिबजींच्या जीवनकार्यावर प्रकार टाकणारी चित्रफित रथाद्वारे ठिकठिकाणी दाखविण्यात येत आहे. दि.7 डिसेंबर रोजी नागपूर येथे शहिदी शताब्दी समागमानिमित्त आयोजित कार्यक्रमाची जनजागृती देखील रथाच्या माध्यमातून केली जात आहे. अकोल्याबरोबरच जिल्ह्यातील महत्वाची शहरे, तसेच पातूर तालुक्यातील आलेगाव, पारस अशा विविध ठिकाणी चार चित्ररथांद्वारे कार्यक्रमाची माहिती पोहोचविण्यात येत आहे. 

 ०००


#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji   #ShahidiSamagam #AKOLA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी