विभागीय स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धांचा समारोप मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वितरीत





 विभागीय स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धांचा समारोप

मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वितरीत

अकोला, दि. 31 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धांचे बक्षीसवितरण आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात झाले. पाचही जिल्ह्यांतून सुमारे 750 विद्यार्थी संमेलनात सहभागी झाले.

                       जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विनोद गवळी, समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ, सहायक आयुक्त पीयुष चव्हाण, निवासी शाळा विशेष अधिकारी सचिन मोरे, रेखा ठाकरे, जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.   

        अमरावती विभागातील मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच क्रीडा नैपुण्य विकसित होण्यासाठी हे संमेलन घेण्यात आले. बहुविविध सांस्कृतिक कलाप्रकारांबरोबरच सांघिक व वैयक्तिक मैदानी खेळ स्पर्धाही घेण्यात आल्या. त्यात बुलडाणा जिल्ह्याने चॅम्पियनशिप अवॉर्ड मिळवला.

प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी संमेलनाचा शुभारंभ झाला. प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण सहाय्यक आयुक्त एम.जी.वाठ, यवतमाळच्या मंगला मून, वाशिमचे पियुष चव्हाण, बुलडाण्याचे मनोज मेरत व अमरावतीचे राजेंद्र जाधवर यांच्यासह बहुजन कल्याण अधिकारी अभिजित काळेसमाजकल्याण अधिकारी सरिता बोबडेगोपाळराव वाघमारे आदी उपस्थित होते. समारोपप्रसंगी श्री. भट, श्री. पवार, श्री. गवळी यांनी मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. नितीन इंगळे, आम्रपाली घनबहादूर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. नितीन इंगळे व आम्रपाली घनबहादूर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. उमेश वाघ, शैलेश कुलकर्णी, संतोष पद्मने यांनी परिश्रम घेतले.

००० 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा