राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किरकोळ शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन
जिल्ह्यात जिल्हाधिकारी वर्षा मिना व उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्या नियोजनात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विविध आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून DEIC, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे रविवारी
किरकोळ शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. असलम तसेच सोलर फ्लेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. कृष्णकुमार केसान यांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करण्यात आल्या.
शिबिरामध्ये जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 47 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी 40 रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान करण्यात आले असून, या सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व DEIC कार्यक्रमांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य सेवांचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला* यांनी केले आहे.
.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा