नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक मतमोजणी पूर्वतयारी
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक मतमोजणी पूर्वतयारी
अकोला जिल्ह्यातील अकोट,मुर्तिजापुर,तेल्हारा,हिवरखेड नगरपरिषद आणि
बार्शिटाकळी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकी करिता मतदान दिनांक ०२ डिसेंबर,२०२५ रोजी झाले असून बाळापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकी
करिता मतदान दिनांक २० डिसेंबर,२०२५ रोजी
होणार आहे. आणि सर्व नगरपरिषद/नगरपंचायतींची मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर,२०२५ रोजी होणार आहे.
मतदान पुर्वी मतदान यंत्र सेटींग व सिलींग करण्याची
प्रक्रिया करण्यात येते. सदर प्रक्रिया अकोट नगरपरिषदे करता दिनांक २८ नोव्हेंबर
२०२५ रोजी तर मुर्तिजापुर,तेल्हारा,हिवरखेड आणि बार्शिटाकळी करिता २९ नोव्हेंबर,२०२५ रोजी तसेच बाळापूर करिता दिनांक १७ डिसेंबर,२०२५ रोजी संबंधित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष करण्यात आली असून
प्रत्येक बॅलेट युनिट (BU) व कंट्रोल युनिट (CU) बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर नोंदवही
ठेवण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष मतदान सुरु होण्याच्या एक तास आधी प्रत्येक
मतदान केंद्रावर उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष मॉकपोल (अभिरुख
मतदान) करुन मतदान यंत्रे Clear करुन सिल करण्यात
आले व त्यावर उमेदवार किंवा त्यांचे मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्ष-या घेण्यात आले.त्यानंतर
प्रत्यक्ष मतदान सुरु करण्यात आले.प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांनी नियुक्त
केलेले मतदान प्रतिनिधी पुर्ण दिवस हजर होते.मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सदर
मतदान प्रतिनिधी यांच्या समक्ष मतदान यंत्र बंद करुन सिलबंद करण्यात आलेले असून
त्यावर सदर मतदान प्रतिनिधी आणि मतदान केंद्राध्यक्ष यांच्या स्वाक्ष-या घेण्यात
आलेल्या आहेत.तसेच बाळापूर करिता दिनांक २० डिसेंबर,२०२५ रोजी मतदान होणार आहे.
दिनांक ०२ डिसेंबर,२०२५ रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी
|
नगर परिषदा/ नगर पंचायत |
एकूण मतदार |
एकूण मतदान केंद्र |
वेळ 7.30 ते 5.30 |
|||||||
|
पुरुष |
महिला |
इतर |
एकूण |
पुरुष |
महिला |
इतर |
एकूण |
टक्केवारी |
||
|
अकोट |
42361 |
39964 |
0 |
82325 |
90 |
28392 |
25220 |
0 |
53612 |
65.12% |
|
मुर्तिजापूर |
19831 |
20214 |
4 |
40049 |
46 |
13432 |
12396 |
4 |
25832 |
64.50% |
|
तेल्हारा |
9267 |
9006 |
0 |
18273 |
20 |
6737 |
6055 |
0 |
12792 |
70.00% |
|
हिवरखेड |
10474 |
9698 |
0 |
20172 |
20 |
8062 |
6850 |
0 |
14912 |
73.92% |
|
बार्शीटाकळी |
10283 |
10664 |
0 |
20947 |
28 |
7978 |
7327 |
0 |
15305 |
73.07% |
|
एकूण |
92216 |
89546 |
4 |
181766 |
204 |
64601 |
57848 |
4 |
122453 |
67.37% |
मतदान प्रक्रिये नंतर
मतदानयंत्रे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष संबंधित सुरक्षा
कक्षात (Strong
Room) मध्ये व्यवस्थीतपणे
ठेवून सुरक्षा कक्ष सिलबंद करण्यात आले.सदर सिलवर उमेदवार किंवा त्यांचे
प्रतिनिधी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वाक्षरी केलेली आहेत.सिलबंद केलेले
सुरक्षा कक्ष पोलीस यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आले असून लॉगबुक ठेवून त्यामध्ये
नोंद घेण्यात आलेली आहेत.
- सुरक्षा कक्षा मध्ये मतदानयंत्रे
ठेवण्यापुर्वी सदर सुरक्षा कक्षा करिता पोलीस विभाग, सार्वजनिक
बांधकाम विभाग, विद्युत विभाग,अग्निशमन विभाग यांच्या कडून तपासणी करुन त्यांचे
प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहेत.
- सुरक्षाकक्ष पेस्ट कंट्रोल करण्यात आलेले आहेत.
- सुरक्षा कक्षा बाहेर CCTV Camera लावण्यात आलेले असून त्यांचे स्क्रीन सुरक्षाकक्षा
बाहेर लावण्यायत आलेले आहेत. तसेच उमेदवारांना त्या ठिकाणी पाहण्यासाठी व्यवस्था
करण्यात आलेली आहे.
- सुरक्षा कक्षा बाहेर पोलीस अधिकारी आणि शस्त्र पोलीस
कर्मचा-यांच्या २४ तासांच्या ३ पाळी मध्ये बंदोबस्त लावण्यात आलेले असून
इतर अधिकारी व कर्मचा-यांच्या सुध्दा निगरानी राख्ण्याकरिता ड्युटी लावण्यात
आली असून त्यांना सुरक्षा कक्षा बाहेर बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली
आहे.
मतमोजणी आरखडा खालील
प्रमाणे आहे.
|
स्थानिक स्वराज्य संस्था |
मतमोजणी चे ठिकाण |
एकूण मतदान केंद्र |
एकूण टेबल |
एकूण फेरी |
|
अकोट |
ट्रायसेम सभागृह क्र. 2, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, पोपटखेड रोड, अकोट |
90 |
12 |
9 |
|
मुर्तिजापुर |
नगर परिषद मुर्तिजापूर इमारत
क्रमांक ४ |
46 |
6 |
12 |
|
बाळापूर |
शासकीय धान्य गोदाम, खामगांंव
नाका, बाळापूर |
43 |
12 |
4 |
|
तेल्हारा |
डॉ केशव हेडगेवार मंगल
कार्यालय हिवरखेड रोड, तेल्हारा. |
20 |
5 |
5 |
|
हिवरखेड |
तेल्हारा तालुका शेतकी खरेदी
विक्री संस्था कार्यालय, हिवरखेड येथील हॉल |
20 |
5 |
5 |
|
बार्शिटाकळी |
नगर पंचायत कार्यालय
बार्शिटाकळी़2़3 |
28 |
4 |
8 |
मतमोजणी करिता सुरक्षा कक्षाचे सिल उमेदवार किंवा त्यांचे
प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्या समक्ष काढून व्हिडीओ कॅमरा समोर सुरक्षा
कक्ष उघडण्यात येईल आणि फेरी निहाय मतदानयंत्रे सुरक्षाकक्षातुन काढून मतमोजणी कक्षात आणल्या जाईल, तसेच सदर मतदान
यंत्रांचे सिल संबंधित टेबलावर नियुक्त केलेली उमेदवारंचे मतमोजणी प्रतिनिधी
यांना दाखुन,त्यांची खात्री पटल्यावर सदर
मतदान यंत्राची मतमोजणी करण्यात येणार आहे.
मतमोजणीला सुरुवात करतांना मतदानयंत्रातील बॅटरी लो किंवा
बॅटरी बंद पडल्यास मा.राज्य निवडणूक आयोगाचे १३ जुन,२००५ च्या आदेशानुसार संबंधित मतदान यंत्रात नवीन बॅटरी
घालण्यात येईल.असे करण्यापुर्वी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे घोषणापत्र
लिहुन त्यावर सर्व उपस्थित उमेदवार/मतमोजणी प्रतिनिधी यांच्या सह्या घेतील.
असे अकोला जिल्ह्यातील सर्व
नगरपरिषदांची निवडणूक निर्भय,मुक्त आणि
पदारदर्शकपणे पार पाडण्यात आली असून, मतमोजणी बाबत सुध्दा मा.राज्य निवडणूक आयोगाचे आदेश व
निर्देशानुसार पुर्ण तयारी करण्यात आलेली आहेत.
नगरपरिषद प्रशासन
जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा