विभागीय युवक महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ महोत्सवातून तरूणाईच्या सर्जनशीलतेचा आविष्कार जिल्हाधिकारी वर्षा मीना






 

विभागीय युवक महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

महोत्सवातून तरूणाईच्या सर्जनशीलतेचा आविष्कार

जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. 1 : तरूणांतील  प्रज्ञा, प्रतिभा व नवसर्जनशीलतेचा आविष्कार युवक महोत्सवासारख्या उपक्रमातून होतो. जीवनात करिअरइतकेच कलागुणांनाही प्राधान्य दिले पाहिजे. त्यातून व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात करिअर केले तरी  छंद, कलागुण कायम जोपासा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.

 

क्रीडा विभागातर्फे विभागीय युवक महोत्सवाचा शुभारंभ वसंत देसाई क्रीडांगणात जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, प्रा. मधू जाधव, शाहीर वसंत मानवटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकनृत्य, चित्रकला, लोकगीत, वक्तृत्व, कवितालेखन व नवोपक्रम म्हणून विज्ञान प्रदर्शन अशा विविध सादरीकरणांची रेलचेल असलेल्या विभागीय युवक महोत्सवात पाचही जिल्ह्यातील गुणवंत महाविद्यालयांचा सहभाग आहे.

महोत्सव हा प्रज्ञा- प्रतिभांचा संगम असून, युवकांनी आपले कलागुण आयुष्यभर जोपासण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रयोगांची माहिती जाणून घेतली. श्री. भट यांनी प्रास्ताविक केले. विकास पल्हाळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल निंबाळकर, तेजस्विनी समर्थ, अर्चना गुप्ता, संजय आगाशे, विशाल नंदागवळी, सुभाष धार्मिक, संदीप शेवलकर, स्वप्नील इंगोले, आकाश हराळ, डॉ. अर्जन बी युसुफ शेख, अमोल शिरसाट, नितीन मोहोड, राजेश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

०००
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी