तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली
तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली
अकोला, दि. 26 : जिल्हा प्रशासनातर्फे अकोट वन्यजीव विभागाच्या सहकार्याने
दि. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान नरनाळा
निसर्गपर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाची पूर्वतयारी सुरू असून, विविध कार्यक्रमांच्या
आयोजनासाठी सेवा पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत.
त्यानुसार विविध कार्यक्रमांसाठी 3 दिवस
सलग स्टेज, 40 बाय 60 फूट (एलईडी स्टेज), 500 व्यक्तींसाठी बसण्याची व्यवस्था असलेला
मंडप, अनुषंगिक साहित्यासह प्रदर्शनासाठी दालने, प्रकाशयोजना, ध्वनीक्षेपण यंत्रणा,
जनरेटर, निवासी तंबू (लहान व मोठे), संपूर्ण महोत्सवादरम्यान स्वच्छतेची व्यवस्था करणे
आदी कामे होणे आवश्यक आहे.
इच्छूक पुरवठादारांनी दि. 6 जानेवारी
2026 पर्यंत पाकिटबंद दरपत्रक उपविभागीय अधिकारी कार्यालय, अकोट येथे कार्यालयीन वेळेत
सादर करावे. हे दरपत्रक दि. 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी
कार्यालय, अकोट येथे उघडण्यात येतील.
हे दस्तऐवज आवश्यक
दरपत्रक सादर करताना दोन लिफाफे असावेत. लिफाफा क्र. 1 मध्ये बयाणा
रक्कम रु. २५ हजार रू. चा उपविभागीय अधिकारी, अकोट यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँक शाखेकडील
अथवा शेड्युल बँकेचे 6 महिने कालावधीकरिता एफ.डी.आर. असावा. पॅन/टॅन कार्डाच्या सत्यप्रती,
कंत्राटदाराचे जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र, मागील वर्षाची
सरासरी आर्थिक उलाढाल किमान १० लाखांपेक्षा जास्त व तसे दर्शविणारे मान्यताप्राप्त
चार्टर्ड अकाऊंटंट यांचे प्रमाणपत्र सादर करावे. पुरवठाधारक हा कुठल्याही शासकीय व
निमशासकीय कार्यालयाच्या कामाच्या काळ्या यादीत नाव समाविष्ट नसल्याबाबतचे, तसेच भारतीय
दंड न्याय संहितेच्या कोणत्याही कलमान्वये शिक्षा/काळ्या यादीत नाव नसल्याचे घोषणापत्र
सादर करावे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम-1948 नुसार नोंदणी प्रमाणपत्र सादर
करावे.
लिफाफा क्र. 2 मध्ये दरपत्रकामध्ये दर भरून सादर करावेत. दरपत्रक भरताना
दर सर्व करांसहित (जीएसटीसह) भरण्यात यावेत. जीएसटी भरण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली
राहील. लिफाफा क्र. १ प्रथम उघडण्यात येईल. त्यातील सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल
तरच लिफाफा क्र. २ उघडण्यात येईल. दरपत्रके मंजूर अथवा नामंजूर / संपूर्ण प्रक्रिया
रद्द करण्याचे सर्वाधिकार सक्षम प्राधिकाऱ्यास राहतील, असे अकोट येथील उपविभागीय अधिकारी
मनोज लोणारकर यांनी कळविले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा