राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
अकोला : नियोजन भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन आज साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा मीना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. डिजिटल न्यायाद्वारे ग्राहक तक्रारींचे कार्यक्षम आणि वेगवान निवारण या विषयावर केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार मार्गदर्शन व जनजागृती यावेळी करण्यात आली. जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी,
जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र यन्नावार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना निमजे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हा पुरवठा कार्यालय अकोला व तहसील अकोला येथील अधिकारी, कर्मचारी व मोठ्या प्रमाणावर ग्राहक उपस्थित होते. संजय पाठक, कैलास बगडे यांनी ग्राहकांच्या हक्काबाबत ग्राहकांना मार्गदर्शन केले. जिल्हा ग्राहक मंच अकोलाचे अध्यक्ष श्री. कुलकर्णी यांनी यावेळी “डिजिटल न्यायाद्वारे ग्राहक तक्रारींचे कार्यक्षम आणि वेगवान निवारण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कलापथकाचा तसेच पथनाटय यांच्याद्वारे प्रबोधनत्मक कार्यक्रमही झाला. कार्यक्रमस्थळी बीएसएनएल, महावितरण, आयओएसएल, बीपीसीएलजी एचपीसीएल,, गॅस कंपनी, वैधमापन विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन अकोला, शासकीय महाविदयालय तसेच जिल्हा आरोग्य विभागाचे मुख्य समन्वयक अकोला यांनी आवश्यक साहित्य, फोटो इत्यादीची प्रदर्शनी लावून राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्व ग्राहकांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना उस्केल यांनी केले तर प्रस्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र यन्नावार यांनी केले. आभार रसिका वाकोडे यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा