सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक गट-क पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अकोला दि. 11 जिल्ह्यातील नोकरी करीता पात्र असलेल्या माजी सैनिकांना कल्याण विभाग व विभागाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण ७२ पदांकरीता सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस त्यानंतरच्या पसंती क्रमाने) पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरील पदांपैकी ०३ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० % अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता/उपलब्धेनुसार भरण्यात येईल.
सदर भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांचे मार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांनी वेब-बेस्ड (web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर (Resources Tab ---> Recruitment Tab येथे दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी २३.५९ वाजेपर्यंत सादर करता येईल. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल. तरी जिल्ह्यातील पात्र आणि इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मेजर आनंद शरद पाथरकर, सेना मेडल (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), अकोला यांनी केले आहे.
वरील पदांपैकी ०३ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० % अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता/उपलब्धेनुसार भरण्यात येईल.
सदर भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांचे मार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांनी वेब-बेस्ड (web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा