नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अकोट- पोपटखेड रस्ता वाहतुकीत बदल

 

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक

अकोट- पोपटखेड रस्ता वाहतुकीत बदल

अकोला, दि. 1 : अकोट नगरपरिषद क्षेत्रात निवडणुकीचे मतदान व मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने अकोट- पोपटखेड या रस्त्यावरील वाहतुकीत दि. 2 डिसेंबरला सायं. 6 ते रात्री 9 आणि दि. 3 डिसेंबरला सकाळी 6 ते सायंकाळी 6 वा. पर्यंत बदल करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला.

न. प. क्षेत्रातील मतदान पूर्ण झाल्यानंतर दि. 2 डिसेंबरला सायं. 6 वाजता मतपेट्या पोपटखेड रस्त्यावरील आयटीआय येथील ट्रायसेम हॉल येथे नेण्यात येणार आहेत. त्यामुळे अकोट ते पोपटखेड मार्गावरील वाहतुकीसाठी यादिवशी सायं. 6 ते रात्री 9 या वेळेत अकोटकडून पोपटखेडकडे जाणा-या वाहनांनी जुना बोर्डी रस्ता ग्रामीण रूग्णालय अकोट मार्गाचा वापर करावा, तसेच पोपटखेडकडून अकोटकडे येणा-या वाहनांनी मोहाळा- अकोलखेड मार्गे अंजनगाव रस्त्याचा वापर करावा.

त्याचप्रमाणे, मतमोजणीच्या दिवशी (3 डिसेंबर) मतमोजणी आयटीआयमधील ट्रायसेम हॉल येथे असल्याने अकोट ते पोपटखेड रस्त्यावर सर्वपक्षीय उमेदवार तसेच समर्थकांची गर्दी होणार असल्याने वाहतुकीस अडथळा येऊ शकतो. त्यामुळे यादिवशी सकाळी 6 वा.पासून ते सायं. 6 वाजेपावेतो अकोटकडून पोपटखेडकडे जाणा-या वाहनांनी जुना बोर्डी रस्ता- ग्रामीण रुग्णालय मार्गाचा वापर करावा, तसेच पोपटखेडकडून अकोटकडे येणारी वाहने मोहाळा - अकोलखेड मार्गे अंजनगाव रस्त्याने यावी. या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी