1098 बाल हक्कांचा जीवनदायिनी धागा
1098 बाल हक्कांचा जीवनदायिनी धागा
मुले म्हणजे राष्ट्राचे भविष्य, आणि या भविष्याला सुरक्षित, निरोगीआणि आनंदी ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. दुर्दैवाने,आजही अनेक बालकं शोषण, अत्याचार, घरगुती हिंसा, भिक्षामागणारी मुलं, बालमजुरी किंवा दुर्लक्ष यांसारख्या समस्यांना सामोरं जात आहेत. अशा प्रत्येक वेळी "चाइल्ड हेल्पलाईन - 1098" हाक्रमांक त्या बालकांसाठी आशेचा किरण ठरतो. ही सेवा भारत सरकारचा महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत चालवली जाते आणि ती पूर्णपणे मोफत व 24 तास उपलब्ध असते. या क्रमांकावर कोणतीही मुल — संकटात असलेलं, हरवलेलं
किंवा त्रासात असलेलं — थेट फोन करून मदत मागू शकतं.
तसंच, नागरिकांनाही एखाद्या बालकावर होणारा अन्याय, अत्याचारकिंवा दुर्लक्ष दिसल्यास 1098 वर फोन करून तात्काळ माहिती देता येते.
या सेवेच वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ ऐकून घेत नाही, तर कृती करते.फोन मिळाल्यानंतर चाइल्डलाइनची स्थानिक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचवते, पोलिस, बाल कल्याण समिती आणि सामाजिक संस्थांशी समन्वय साधून त्या बालकाला सुरक्षित ठिकाणी नेते. नंतर त्या मुलाला निवारा, अन्न, वैद्यकीय मदत, समुपदेशन, शिक्षण आणि आवश्यक असल्यास पुन्हा कुटुंबाशी पुनर्वसन यासारखी मदत दिली जाते.ही हेल्पलाईन फक्त एक क्रमांक नाही, तर हजारो मुलांच्या आयुष्यातील उजेडाचा दरवाजा आहे. अनेक मुलांना या माध्यमातून
नवीन जीवन मिळालं आहे — काही शाळेत परतले, काहींच आयुष्य सुरक्षित झालं, तर काहींना प्रेमळ आश्रय मिळाला.आपल्या सारख्या जबाबदार नागरिकांनी या सेवेबद्दल जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे. रस्त्यावर भटकणारं मूल, भिक्षा मागणारं, काम करणारं किंवा त्रासात असलेलं मूल दिसलं, तर फक्त एक फोन - चाइल्ड हेल्प लाईन 1098 करा हा एक छोटासा प्रयत्न एखाद्या बालकाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.चला, आपण सगळे मिळून ही सामाजिक जबाबदारी निभावा.
आपल्या शाळा, कॉलेज, गाव सभा, महिला मंडळ, युवक गट या सर्व माध्यमांतून चाइल्ड हेल्प लाईन- 1098 बद्दल जागरूकता
निर्माण करूया लक्षात ठेवा - एक फोन, एका बालकाचं आयुष्य वाचवू शकतो.
चाइल्ड हेल्पलाईन 1098 -

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा