श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागममध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे मानवता रक्षणासाठी श्री.गुरू तेग बहादूर यांचे बलिदान प्रत्येकाला प्रेरणा
अकोला, दि. ३० : 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जानेवारीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे.तर ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागमचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्यस्तरीय समितीच्या वतीने करण्यात आहे.
राज्य समिती,स्थानिक समिती व समाजबांधवांच्या उपस्थितीत बैठक नियोजनभवनात झाली.
यावेळी राज्य समितीचे किसनराव राठोड, महंत जितेंद्र महाराज,महंत सुनील महाराज यांच्यासह नंदू पवार अभिमान महाराज, गुरुमितसिंग गोसल,सुरजीतसिंग अकाली, लताताई राठोड,प्रकाश गोगलिया,हरीश पारवानी, सदाशिव चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत.मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर रोजी नागपूर,२१ डिसेंबर रोजी नवी मुंबई तर जानेवारीमध्ये नांदेड कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा आणि हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.तहसील, शहर जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात श्री गुरू तेग बहादूर यांच्या हौतात्म्याचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा.या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शीख, सिकलीगर, बंजारा,
लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे.श्री गुरू तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे.या कार्यक्रमामुळे गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
000000


.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा