सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलनाचा गुरूवारी शुभारंभ
सशस्त्र सेना ध्वजदिन 2025
निधी संकलनाचा गुरूवारी शुभारंभ
अकोला, दि. 16 : ध्वजदिन निधी
संकलनाचा शुभारंभ व माजी सैनिकांचा मेळावा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत
दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. आकाशवाणीनजिक माजी सैनिक मुलांचे वसतिगृह येथे होणार
आहे.
या कार्यक्रमात वीरपत्नी, वीरमाता,
वीरपिता, शौर्यपदकधारक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दिवंगत सैनिकांच्या पत्नी यांना
मंजूर आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरणही यावेळी होईल.
भारताच्या संरक्षणासाठी प्राणार्पण
करणा-या जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन
सुसह्य व्हावे,तसेच युद्धात अपंगत्व आलेल्या किंवा निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी विविध
कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजनिधीचा उपयोग केला जातो. यावेली माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय व नागरिकांनी
उपस्थित राहण्याचे आवाहन मेजर आनंद शरद पाथरकर यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा