खाजगी वाहनांना आकर्षक पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आरटीवोचे आवाहन
अकोला, दि ९ : प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे खाजगी चारचाकी वाहनांसाठी MH30CB ही नविन मालिका सुरु करण्यात येत आहे.
यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी करीता नियमित विहित शुल्क भरुन तसेच अन्य वाहन वर्गासाठी विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरुन आकर्षक पसंती क्रमांक राखीव करावयाचे आहेत, त्यांनी दिनांक ११ डिसेंबर रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या दरम्यान पसंतीचे क्रमांकाच्या विहित नमुन्यातील अर्जासह आधार कार्ड, रहिवाशी पत्ता पुरावा, पॅनकार्ड या कागदपत्रांच्या साक्षंकित प्रती व पसंतीक्रमांक विहीत शुल्काचा डी.डी. बंद लिफाफ्यात कार्यालयाच्या रोख विभागात जमा कराव्यात. सदर लिफाफ्यावर वाहन मालकाचे नाव, वाहन वर्ग, पसंती क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक लिहिलेला असावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले आहे.
एका नंबर करीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता लावण्यात येईल, सदर लिलाव यादीमध्ये अर्जदाराचे नांव व पसंती क्रमांक असल्यास अर्जदाराने पसंती क्रमांक लिलावाचे शुल्क व्यतिरीक्त लिलावासंदर्भात अतिरीक्त रकमेचा डी. डी. १२ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत रोख विभागात बंद लिफाफ्यात जमा करावा, लिफाफ्यावर नांव, पसंती क्रमांक, मोबाईल क्रमांक, वाहनाचा वर्ग नमूद करावा.पसंतीक्रमासाठी त्याच दिवशी दुपारी ४ वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात लिलाव करण्यात येईल.
सदर डीडी आर.टी.ओ. अकोला या नावे राष्ट्रीयकृत शेडयुल्ड बँकेचा अकोला येथील असावा तसेच तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा