श्री गुरू तेग बहादूर यांचे 350 वे शहिदी समागम वर्ष शहरात बुधवारी मोटरसायकल रॅलीचे आयोजन

 श्री गुरू तेग बहादूर यांचे 350 वे शहिदी समागम वर्ष

शहरात बुधवारी मोटरसायकल रॅलीचे आयोजन

अकोला, दि. २  : 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रम होणार असून, जिल्ह्यातील शेकडो भाविक नागपूरला जाणार आहेत. त्यानिमित्त अकोला शहरात उद्या बुधवार, दि. 3 डिसेंबरला दु. 2.30 वा. गुरुद्वारा सिंघ सभा येथून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातून शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, वाल्मीकि, मोहयाल, सिंधी आदी समाजबांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होणार आहेत.  

रेल्वेस्थानक चौक परिसरातून ही रॅली पुढे जिल्हा न्यायालय, सातव चौक, राऊतवाडी चौक, रतनलाल प्लॉट, नेहरू उद्यान, गोरक्षण रस्ता, पुढे कौलखेडवरून सिंधी कँप, अशोक वाटिका, बसस्थानक, चांदेकर चौक, गांधी चौक, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशी जाऊन न्यू राधाकिशन प्लॉट येथे गुरुद्वारा येथे समारोप होणार आहे. अधिकाधिक भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी