अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा
अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा
अकोला,
दि. 19 : बालविवाहमुक्त भारत संकल्प अभियान १०० दिवस व बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमात
अकोट येथील विद्यांचल द स्कूल या शाळेत अकोट तालुक्यातील महिला शिक्षिकांसाठी
महिला बालके यांच्याशी संबंधित कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळा मंगळवारी
झाली.
जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रोशनी बन्सल यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
झाले. प्राचार्य शैलजा त्रिवेदी अध्यक्षस्थानी होत्या. ॲड नितेंद्र उंबरकर, जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, प्रांजली जैस्वाल, शुभांगी लाहुडकर, डॉ.प्रीती कोगदे, मधुकर सूर्यवंशी, ॲड. मनिषा भोरे, पीएसआय वैभव तायडे उपस्थित
होते.
बाललैंगिक
अत्याचार अधिनियम, कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम, बालविवाह
अधिनियम,
बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम, सायबर
सुरक्षितता,कौटुंबिक हिंसाचार अधिनियम, तसेच
महिलांचे कायदे, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना याबाबत कार्यशाळेत
मार्गदर्शन करण्यात आले. कायदेविषयक पुस्तिकेचे वितरणही यावेळी झाले. तालुक्यातील 410 महिला शिक्षिका सहभागी होत्या. श्री. पुसदकर यांनी प्रास्ताविक
केले. अनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. रुपाली साबळे यांनी आभार मानले. गजानन
सावरकर, साधना वाघोडे, महेंद्र काकड , वंदना नाथे , लता डांबरे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेमध्ये जिल्हा बाल संरक्षण
कक्षाचे सुनील लाडुलकर,प्रिया इंगळे,
महेंद्र गनोदे राम चतुरकर उपस्थित होते.
०००


.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा