श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमांची माहिती सर्वदूर पोहोचवा जिल्हाधिकारी वर्षा मीना

 













श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन

उपक्रमांची माहिती सर्वदूर पोहोचवा

जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. १  : 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त राज्य शासन आणि शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील, तसेच विदर्भातील अनेक भाविक यावेळी नागपूरला जाणार आहेत. 

जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, आवश्यक  सुविधांची पूर्तता व्हावी. या उपक्रमांची माहिती सर्वदूर पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.  

                                                                                                                                                जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत समिती सदस्य व समाजबांधवांच्या उपस्थितीत बैठक महसूलभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. गुरमितसिंग गोसल, इंद्रजीतसिंग गुजराल, सुरजीतसिंग अकाली, रमेश पवार, विजय चव्हाण, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर आदी उपस्थित होते.  

 

श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य,  संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला.  श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त  नागपूर येथे भव्य कार्यक्रम होत आहे. अकोला जिल्ह्यातून शेकडो भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने आवश्यक नियोजन व सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी दिले. 

श्री गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा आणि हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. अकोला येथेही  मोटरसायकल रॅली व इतर उपक्रमांचे आयोजन होत आहे.

गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शीख, सिकलीगर, बंजारा,लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडणार आहे. श्री गुरू तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

00

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी