आखतवाडा येथे लोकसहभागातून वनराई बंधारा



 आखतवाडा येथे लोकसहभागातून वनराई बंधारा



 आखतवाडा : 'पाणी अडवा, पाणी जिरवा'  ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत मौजे आखतवाडा येथे ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. या उपक्रमामुळे गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, शेतीसाठी भेडसावणारे पाण्याचे संकट कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे व या उपक्रमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.


जलसंधारणाच्या या महत्त्वपूर्ण कामात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दुष्काळसदृश परिस्थितीत पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाला कृषी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. या वेळी शेतकरी श्री रामेश्वर चिपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 




विभागाकडून उप विभागीय कृषी अधिकारी श्री विवेक बिऱ्हाडे  , तालुका कृषी अधिकारी श्री वाशीमकर ,मंडळ कृषी अधिकारी श्री बेले , तालुक्यातील उप कृषी अधिकारी श्री देशमुख ,  सहायक कृषी अधिकारी श्री वानखडे ,  श्री वाकोडे ,श्री हिवाळे ,श्री बंड ,श्री बोळे श्री घाटोळ ,सौ राऊत , सौ अटंमबर यांनी बंधाऱ्याच्या उभारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच नरेंद्र महाराज गट अकोला यांचे महिला यांनी मोठ्या संख्येने श्रमदान केले.


....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना