नागरीकांना विहित वेळेत सेवा प्रदान कराव्यात: माया इरतकर
सार्वजनिक वितरण व्यवस्था आढावा बैठकअकोला, दि 11 : राज्य अन्न आयोगाच्या सदस्या माया इरतकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी सार्वजनिक वितरण व्यवस्था या विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन धान्य वितरणबाबत आढावा घेतला व मार्गदर्शन केले.पुरवठा विभाग हा लोकाभिमुख असल्याने नागरीकांचे कामकाज वेळेत पूर्ण करून विहित वेळेत सेवा पुरवण्यात याव्यात असे सांगितले.तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये येणा-या वअडचणी सोडविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र येन्नावरसह पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा