जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून सायक्लोथॉन; अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

 







जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ



अकोला, दि ३०: जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत आरोग्य विषयी जनजागृतीच्या माध्यमातून आपले आरोग्य निरोगी राखावे व नागरिकांच्या मनातील एचआयव्ही आजारा बाबत असलेली भीती व गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग, आयएमए,महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था यांच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी श्रीमती मीना जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सहभाग नोंदवत ८ किलोमीटर रॅली पूर्ण केली.
या उपक्रमात विद्यार्थी, युवक,  डॉक्टर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.प्रारंभी एड्स जनजागृती शपथ घेण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आरती कुलवाल, आयएमए अकोला अध्यक्ष डॉ संतोषकुमार सोमाणी,प्रकल्प प्रमुख डॉ.किशोर पाचकोर यांच्यासह
सार्वजनिक आरोग्य विभाग व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


सायकल रॅली ची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गे सरकारी बगीचा, माणिक टॉकीज रोड अग्रसेन चौक दुर्गा चौक हॉल रोड, नेहरू पार्क चौक फ्लायओव्हर वरुन पोलीस मुख्यालय निमवाडी सरकारी बगीचा मार्गे सामान्य रुग्णालय येथे समारोप करण्यात आला.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा