आचारसंहिता शस्त्र वापरावर निर्बंध

 

आचारसंहिता

शस्त्र वापरावर निर्बंध

अकोला, दि. 22 ; अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता पालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात लागू असून, या कालावधीत शस्त्र वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश जारी केला.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 नुसार महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातील शस्त्र परवानाधारकाला शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.

बँक, खेळाडू, सुरक्षारक्षक (खनिकर्म विभाग, बँक, कॅश व्हॅन) पीक संरक्षणार्थ आदींना वगळण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा