मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवायसीसाठी अखेरचे २ दिवस



अकोला, दि. २९ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि  केवायसीच्या आधार  प्रमाणीकरण करण्यासाठी  31 डिसेंबरपर्यंत मुदत असून,  ती तत्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती  हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करून पती अथवा वडील यांचे  मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटीतांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करावी.  अंगणवाडी नसल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्जासह कागदपत्रे देऊन शिफारस घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  राजश्री कोलखेडे यांनी केले आहे.


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा