‘स्वाधार’साठी अर्ज करण्यात ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
‘स्वाधार’साठी अर्ज करण्यात ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
अकोला, दि. 19 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अर्ज
करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र; तथापि, वसतिगृहातील
क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
शिक्षण घेता यावे ही योजना राबवली जाते. त्यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांनी
स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात
येते.
यापूर्वी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि. ३० नोव्हेंबर
होती; पण ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने अनेक अर्ज प्रलंबित होते. त्यामुळे
जिल्हा स्तरावरील तसेच तालुका स्तरावरील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना
अर्ज करण्यास दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांनी तातडीने ऑनलाईन अर्ज होस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम https://hmasscrutinyworkflow.mahait.org/
या संकेतस्थळावर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे
सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेसाठी यापूर्वी अर्ज केलेला असणे आवश्यक
आहे. त्यामुळे स्वाधार योजनेकरिता अर्ज भरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या
प्रथम वर्षाकरिता स्वाधार योजनेचा प्रथम वर्षाकरिता अर्ज करताना ही महत्वाची बाब लक्षात
घेवून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तसेच ज्या तालुकास्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मुला/मुलींचे
वसतीगृह नसेल असे नवीन अर्ज ऑफलाईन स्वीकारण्यात येतील, असे श्री. वाठ यांनी कळवले
आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा