विटेक्स 2026 : विविध उत्पादनांचे विक्री प्रदर्शन
विटेक्स 2026 : विविध उत्पादनांचे विक्री प्रदर्शन
अकोला, दि. 31 : विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे ‘विटेक्स
2026’ हे विविध क्षेत्रांतील उत्पादनांचे विक्री प्रदर्शन दि. 2 ते 5 जानेवारी दरम्यान
गोरक्षण मैदानावर सकाळी 10 ते रा. 9 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. त्यात 180 कक्षांचा
समावेश असेल.
व्यापार व उद्योग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बाबींचे सादरीकरण प्रदर्शनातून
होणार आहे. सौर ऊर्जा उत्पादने, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, भेटवस्तू, घर सजावट साहित्य,
फॅशन उत्पादने, ऑटोमोबाईल, कृषी, डाळ गिरणीशी संबंधित यंत्रसामग्री, वित्तसंस्था, कर्जपुरवठा,
लेखा सॉफ्टवेअर, करिअर मार्गदर्शन आदी विविध बाबींशी संबंधित उत्पादने, सेवा 180 कक्षांद्वारे
उपलब्ध असतील. अकोलेकरांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे
अध्यक्ष निकेश गुप्ता, सचिव नीरव वोरा यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा