कलाल समाज मंडळाचा कार्यक्रम मंडळाच्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची जोपासना - पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर
अकोला, दि २८ : कलाल समाज मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी आदर्शवत कार्य उभे केले आहे. समाजातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मान त्यांचे आयुष्य महत्त्वपूर्ण संदेश देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज केले.
ते अकोला जिल्हा कलाल समाज मंडळ, द्वारा आयोजित कलाल समाज मेळाव्यात बोलत होते.यावेळी खासदार अनुप धोत्रे,शल्य चिकित्सक, अमरावती डॉ.आशिष डगवार,भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ,केंद्रीय कलाल समिती अध्यक्ष सुनिल खराटे,उद्योजक राजेंद्र जयस्वाल,केंद्रीय कलाल महिला समिती अध्यक्षा सुनिताताई बावनेर,विजय लोहकपुरे,भैय्यासाहेब उजवणे कलाल समाज मंडळ पदाधिकारी,सदस्य समाज बांधव उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.फुंडकर म्हणाले की, समाजातील युवकांनी नवीन काळाची पावले ओळखून आधुनिक शिक्षण, उद्योग आणि व्यवसायाकडे वाटचाल करावी.
समाज मेळाव्याच्या माध्यमातून सुसंवाद साधला जातो त्यामुळे अशा प्रकारचे मेळावे होणे गरजेचे आहेत.
मेळाव्यात समाजातील ज्येष्ठ सेवाव्रती, उद्योजक, अधिकारी, गुणवंत विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा