महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ आदेश अकोला, दि. 30 : नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक २०२५ प्रक्रीया सुरु झालेली आहे. दि. २ डिसेंबर रोजी मतदान व दि. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी व दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी निकाल प्रसिध्दी करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात वरिल काळामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी कलम ३६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार प्राप्त असलेले अधिकारान्वये नगर परिषद, नगर पंचायत बाळापुर, मुर्तिजापुर, अकोट, तेल्हारा, हिवरखेड, बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व पोलीस उपनिरिक्षक व त्यांचेपेक्षा वरिल दर्जाचे अधिकाऱ्यांना दि. ४ डिसेंबर २०२५ चे रात्री 12 वाजेपर्यंत खालील अधिकार प्रदान करीत आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक कशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी ? याविषयी निर्देश देणे. मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्...
पोस्ट्स
नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
जिल्ह्यातील 11 वाळूघाटांच्या ई- लिलावाला तिस-यांदा मुदतवाढ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जिल्ह्यातील 11 वाळूघाटांच्या ई- लिलावाला तिस-यांदा मुदतवाढ अकोला, दि. 29 : जिल्ह्यातील 15 वाळू घाटांचा लिलाव यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी 11 घाटांच्या लिलावाला तिस-यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-लिलावाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, शुद्धीपत्रक निर्मगित करण्यात आले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार ई- निविदा ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत दि. 9 डिसेंबर रोजी दु. 2 वा. पर्यंत वाढविण्यात आली आहे. ई-निविदा (तांत्रिक लिफाफा) उघडणे, तांत्रिक पडताळणी, आर्थिक लिफाफा उघडणे आदी प्रक्रिया सुधारित वेळापत्रकानुसार दि. 10 डिसेंबर रोजी करण्यात येईल. ई- लिलाव प्रक्रिया (ई-ऑक्शन) दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. पासून दु. 1 वा. पर्यंत पूर्ण करण्यात येईल. अधिकाधिक लिलावधारकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक शासनाच्या महाटेंडर्स, तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकूण 11 वाळूघाट अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, एकलारा, कट्यार, म्हैसांग व उगवा या घाटांचा समावेश आहे. बाळापूर तालुक्यातील निंबी, बहादुरा, सागद...
जिल्ह्यातील 20 वाळूघाटांच्या ई- लिलावाला मुदतवाढ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जिल्ह्यातील 20 वाळूघाटांच्या ई- लिलावाला मुदतवाढ अकोला, दि. 29 : जिल्ह्यातील 23 वाळू घाटांचा लिलाव यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. या 23 घाटांपैकी 20 घाटांच्या लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. या 20 घाटांच्या ई-लिलावाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, शुद्धीपत्रक निर्मगित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लिलावधारकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार ई- निविदा ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत दि. 9 डिसेंबर रोजी दु. 2 वा. पर्यंत वाढविण्यात आली आहे. ई-निविदा (तांत्रिक लिफाफा) उघडणे, तांत्रिक पडताळणी आदी प्रक्रिया सुधारित वेळापत्रकानुसार दि. 10 डिसेंबर रोजी करण्यात येईल. ई- लिलाव प्रक्रिया (ई-ऑक्शन) दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. पासून दु. 1 वा. पर्यंत पूर्ण करण्यात येईल. अधिकाधिक लिलावधारकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक शासनाच्या महाटेंडर्स, तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकूण 20 वाळूघाट मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुर...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अकोला जिल्हा दौरा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला, दि. 25 : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार दि. 29 नोव्हेंबर रोजी अकोला येथे येत आहेत. त्यांचा दौरा खालीलप्रमाणे : शनिवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता हेलिकॉप्टरने हिवरखेड हेलिपॅड, जि. अकोलाकडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता श्री. केवल देशमुख यांच्या मालकीचे शेतातील हेलिपॅड, हिवरखेड, ता. तेल्हारा जि. अकोला येथे आगमन व मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जाहिर सभा. दुपारी 3.05 वाजता मोटारीने हिवरखेड हेलिपॅड जि. अकोलाकडे प्रयाण व हेलिकॉप्टरने अमरावतीकडे रवाना.
जिल्हा युवक महोत्सवाचा शुभारंभ कलागुणांना वाव देण्यासाठी महोत्सव महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी वर्षा मीना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला, दि. २८ : सर्वांगीण विकासासाठी क्रमिक शिक्षणासोबतच कला, क्रीडा, नृत्य यासारखे विविध कलागुण परिपूर्ण व्यक्तिमत्व विकसित करतात. नवनव्या प्रतिभा या महोत्सवातून पुढे येतात. युवकांतील कलागुणांना वाव देण्यासाठी युवक महोत्सव हा महत्वपूर्ण उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने वसंत देसाई क्रीडांगण येथे आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट,श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे आदी उपस्थित होते. महोत्सवात काव्यलेखन,कथालेखन, वक्तृत्व असे अनेक उपक्रम घेतले जातात. त्यातून विद्यार्थी व युवकांना प्रोत्साहन मिळते. कलागुणांचा विकास होतो व नवी प्रेरणा मिळते, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी सांगितले. दोन दिवस चालणाऱ्या युवा महोत्सवामध्ये काव्यलेखन,कथालेखन,वक्तृत्व,नवो पक्रम यासह विविध स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.सतीशचंद्...
संविधान दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त २७५ जात वैधता प्रमाणपत्राचे ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला, दि. 27 : भारतीय संविधानाला २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण झाली असून २६ नोव्हेंबर हा दिवस आपण संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला आहे. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी अकोला येथे करण्यात आले आहे. तसेच सामाईक परिक्षा २०२५ नुसार निकाल जाहिर झालेला आहे. सामाईक परिक्षेनंतर उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमानुसार प्रवेश निश्चित करण्यासाठी ११ वी, १२ वी, विज्ञान शाखेतील नविन प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याकरिता विद्यार्थी यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला या कार्यालयात आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रासह परीपुर्ण असलेली प्रकरणे सादर करण्यात आलेले होते. अशा विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त समितीने निर्णय घेऊन एकूण २७५ जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने या कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले आहे. संविधान ...
हरवलेल्या व्यक्तीबाबत निवेदन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला, दि. 26 : पवन सुनिल मैत्रे ( वय २५ वर्षे, रा. भारती प्लॉट, बाळापूर नाका, जुने शहर, अकोला) हा युवक दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 वाजता घरी कोणालाही न सांगता निघून गेला आहे. घरच्या लोकांनी व नातेवाईकांनी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. उंची 5 फुट 4 इंच, डोळे काळे, केस काळे, रंग सावळा, बांधा सडपातळ, अंगात काळे शर्ट व काळे पॅन्ट, पायात काळ्या रंगाची स्लीपर चप्पल घातली आहे. ज्यांना या युवकाची माहिती मिळाली त्यांनी पोलीस स्टेशन, डाबकी रोड, अकोला येथे संपर्क साधावा. (दू. नं.0724-2445340) तपास अधिकारी एएसआय विजय गव्हाणकर मो. नं. 8380068660
वाहतुकीत शिस्त आणा; अंडरपास लवकर नागरिकांसाठी खुला करा जिल्हाधिका-यांचे निर्देश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला, दि. २६ : शहरातील बसस्थानक परिसरातील अंडरपासबाबत असलेली समस्या त्वरित निकाली काढून अंडरपास नागरिकांसाठी लवकर खुला करावा. शहरातील वाहतुकीत शिस्त निर्माण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. त्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत बोलत होत्या.अपर पोलीस अधिक्षक बी. सी. के रेड्डी, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, मनपा शहर अभियंता नीला वंजारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,जिल्हा परिषद प्रतिनिधी उपस्थित होते. शिवणी विमानतळासमोरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. चुकीच्या दिशेने उड्डाण पुलावरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. वारंवार अपघात होणाऱ्या रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने अपघातप्रवण स्थळ असा फलक, रिफ्लेक्टर्स पुरेशी प्रकाशव्यवस्था आदी उपाययोजना करावी. सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीरपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले. ऑक्टोबर ते नोव्...
अकोट येथे वसतिगृहासाठी जागेचा शोध
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोट येथे वसतिगृहासाठी जागेचा शोध अकोला, दि. 24 : सामाजिक न्याय विभागाच्या अकोट येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू आहे. त्यासाठी सुस्थितीतील इमारत, किमान 8 हजार चौ. फु. चटई क्षेत्र असावे. 8 स्नानगृहे, 8 स्वच्छतागृहे, 80 पलंग सुव्यवस्थित ठेवता येतील. गृहपालाची राहण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, पाण्याची पुरेशी व्यवस्था अशा पद्धतीचे बांधकाम असलेली इमारत असल्यास किमान 3 वर्षांचा इमारत करार मालकासोबत करण्यात येईल. इच्छूकांनी मुलींचे शासकीय वसतिगृह, पोपटखेड रस्ता, अकोट येथे संपर्क साधावा. ०००
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात प्रमाणित हरभरा बियाणे वितरण
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात प्रमाणित हरभरा बियाणे वितरण शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; एसएओंचे आवाहन अकोला, दि. 21 : शे तकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदा नि त दरावर उपलब्ध व्हावे कडधान्य पिकांच्या नवीन वाणाचा प्रचार प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य व नवीन बियाणे अर्थसहाय्य सन २०२५-२६ अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण हरभरा (१० वर्षाआतील) बियाणे रु.५००० प्रति क्वि. (क्षेत्र ०.२० ते २.०० हे. ) मर्यादेत वितरित करण्यात येत आहे. हरभरा या पिकाच्या अनुदान तत्वावर बियाणे लाभ मिळ ण्या करिता सातबारा व फार्मर आयडीसह प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आ वाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ०००
आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती गठित करावी जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती गठित करावी जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन अकोला , दि. 21 : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार , 10 किंवा 10 पेक् षा अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनेमध्ये महिला तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय , निमशासकीय , सार्वजनिक , खासगी आस्थापनांनी अशा समितीचे गठन करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे. शासकीय , निमशासकीय कार्यालय , संघटना , महामंडळे , आस्था पना , स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना , तसेच कोणतेही खाजगी क्षेत्र , संघटना किंवा खाजगी उपक्रम/संस्था , एंटरप्रायजेस , अ शासकीय संघटना , पुरवठा , वितरण व विक्री यासह वाणिज्य , व्यावसायिक , शैक्षणिक , करमणूक , औद्योगिक , आरोग्यसेवा किं...
लघु, मध्यम उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा कर्ज महामेळावा; कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण उद्योजकांना पाठबळ मिळण्यासाठी उपयुक्त उपक्रम खासदार अनुप धोत्रे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लघु, मध्यम उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा कर्ज महामेळावा; कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण उद्योजकांना पाठबळ मिळण्यासाठी उपयुक्त उपक्रम खासदार अनुप धोत्रे अकोला, दि. 21 : जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे लघु, मध्यम उद्योजकांसाठी कर्ज महामेळावा खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत आज झाला. छोट्या उद्योजकांना आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास खासदार श्री. धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केला. औद्योगिक वसाहतीतील अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. खासदार श्री. धोत्रे यांनी उपस्थित राहून बँकेच्या उपक्रमांचे कौतुक केले. असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक बिनिता राणी, विभागीय प्रमुख पंकज कुमार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा व आरबीआयचे पीयुष अग्रवाल उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योग, उद्योजक व सूक्ष्म-मध्यम व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ दिले जाईल, असे पंकज कुमार यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात ग्राहक संवाद उपक्रमाचेही...
अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अन्नधान्य , कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२५ अकोला, दि. 21 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छा मनोबलामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल , तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल , हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. शासन निर्णय क्र.पीकस्पर्धा -२०२०/प्र.क्र.११३/४ए , दि.२० जुलै २०२३ अन्वये रब्बी हंगाम २०२५ मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका , जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी , गहू , हरभरा , करडई ...
आला हिवाळा, तब्बेत सांभाळा हिवाळ्यातील आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाचे आवाहन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आला हिवाळा, तब्बेत सांभाळा हिवाळ्यातील आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाचे आवाहन अकोला, दि. 21 : हिवाळ्यात हवेत आर्द्रतेत घट येते, तापमान घसरते आणि जास्तीत-जास्त वेळ घरात राहण्यामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढते. हिवाळ्यातील काही सामान्य आजार आणि त्यांना टाळण्यासाठीच्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. त्या पाळण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. हिवाळ्यात सर्दी, फ्लू, नोरोव्हायरस, ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियासारखे आजार सामान्यत: दिसून येतात. थंडी सहन करणे कठीण होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन इतर आजारांचा धोका वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत. सर्दी स र्दी म्हणजे श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला झालेला विषाणू संसर्ग. यामध्ये घसा बसणे, खोकला, शिंका, नाक गळणे आणि हलका ताप येणे या लक्षणांचा समावेश होतो. सर्दी हिवाळ्यात सामान्यत: होण्याची शक्यता असते, आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच सर्दी होऊ शकते. इन्फ्लुएन्झा (Flu) इन्फ्लुएन्झा विषाणूंमुळे होणारा फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य ...
शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला; जिल्ह्यात 20 परीक्षा केंद्रे केंद्रांवर कडक बंदोबस्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला; जिल्ह्यात 20 परीक्षा केंद्रे केंद्रांवर कडक बंदोबस्त अकोला, दि. 20 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टेट २०२५) दि. २३ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्ह्यात एकूण 20 परीक्षा केंद्रे असतील. परीक्षेत पहिला पेपर सकाळी १०:३० ते दु. १ या वेळेत व दुसरा पेपर दुपारी २:३० ते ५ या कालावधीत होईल. पहिल्या पेपरसाठी एकूण १४ केंद्रे निश्चित असून, ४ हजार २०० परीक्षार्थी व दुस-या पेपरसाठी एकूण २० केंद्रांची निश्चित असून, परीक्षार्थी ५ हजार ५९४ आहेत. दोन्ही पेपर मिळून ९ हजार ७९४ परिक्षार्थी परीक्षेला बसतील. त्यातील १५९ परिक्षार्थी हे दिव्यांग असून त्यांना नियमानुसार अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. परीक्षार्थींना ओळखीचा पुरावा व परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेतील जिल्हास्तर परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीमार्फत आयोजन होते. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे उपाध्यक्ष व प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव आहेत. परीक्षेच्या सुयोग्य आयोजनासाठी प्राथमिक शिक्...
जिल्ह्यातील 2 लक्ष 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 191 कोटी मदत जमा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला दि. 20 : जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नुकसान मदत व शेतकरी अनुदान वाटपांतर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 42 हजार 335 शेतकऱ्यांच्या खात्यात 191 कोटी 7 लक्ष 7 हजार निधी डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात आले. जुन ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी, आपत्तीच्या अनुषंगाने शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळण्यासाठी जलद कार्यवाही राबविण्यात निर्देश दिले. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे पंचनाम्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना मदत प्राप्त झाली आहे. अकोला तालुक्यात 41 हजार 71 शेतकऱ्यांच्या खात्यात 34 कोटी 67 लक्ष 44 हजार, तसेच अकोट तालुक्यात 37 हजार 366 शेतकऱ्यांच्या खात्यात 32 कोटी 92 लक्ष 78 हजार, बाळापूर तालुक्यात 37 हजार 448 शेतकऱ्यांच्या खात्यात 28 कोटी...