मतदार पडताळणी कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे
अकोला , दि . ३१ ( जिमाका )- दिनांक 1 जानेवारी, 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना आणि नवीन मतदार म्हणून पात्र असलेल्या मतदारांना संधी देण्यासाठी दिनांक 01.01.2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच मतदार यादीमध्ये मृत/स्थलांतरित मतदाराची नावे असल्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत आणि यामुळे मोहिम रूपाने सर्व मतदारांचा तपशील व छायाचित्रे दुरुस्त व प्रमाणित करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार आयोगाने सन 2020 च्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमापूर्वी पूर्वतयारी म्हणुन मतदार पडताळणी कार्यक्रम ( EVP ) घेणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने मतदार पडताळणी EVP कार्यक्रमामध्ये , नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन खालील कागदपत्रा...