जात पडताळणी शिबिरात ३५० प्रमाणपत्रे वितरित
जात पडताळणी शिबिरात ३५० प्रमाणपत्रे वितरित अकोला दि. 9 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समता पंधरवडा उपक्रमांतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यात मंगळवारी घेण्यात आलेल्या त्रुटी पूर्तता शिबिरात ३५० प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात विशेष त्रुटी पूर्तता शिबीर व लोकशाही दिन झाला. शिबीरात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्रुटीअभावी प्रलंबित प्रकरणांत विद्यार्थ्यांकडून त्रुटींची पूर्तता करून घेण्यात आली. सुनावणीतील जातीविषयक पुराव्यांबाबत पूर्तता झालेली प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकशाही दिनामध्ये एकही तक्रार प्राप्त झाली नाही. शिबिरामध्ये एकूण ३५० जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आले आहेत. समितीचे अध्यक्ष जितेंद्र काकुस्ते, उपायुक्त तथा सदस्य अमोल यावलीकर, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी स्वतः शिबिराला उपस्थित राहून अभ्यांगताच्या समस्येचे निराकरण केले. विज्ञान...