विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना

 

 

  

 

विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना

अकोला, दि. 9 : तूर, सोयाबीन आदी विविध पीकांवरील कीड व रोग नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

तूर पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ % निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट ३० % प्रवाही १५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मिटर अंतरावर शेतात उभारावेत.

सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १० % पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५ % एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी किंवा स्पीनोटोराम ११.७ % एस सी ०.५ मिली प्रती लीटर पाणी किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ % एस जी ०.४ ग्राम प्रती लीटर पाणी वापरून फवारणी करावी.

 

भुईमूग पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फ्लुबेन्डामाइड ३.५% + हेक्साकोनॅझोल ५% डब्ल्यूजी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भात पिकावर काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच फिप्रोनिल ५ % एस.सी. २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी 'टी’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज