क्षयरूग्णांना सहकार्यासाठी ‘निक्षय मित्र’

 

क्षयरूग्णांना सहकार्यासाठी ‘निक्षय मित्र’

जिल्ह्यातील अधिकाधिक व्यक्तींनी उपक्रमात सहभागी व्हावे

-         सीईओ बी. वैष्णवी

अकोला, दि. 12 : सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षयरूग्णांना सामाजिक सहकार्य होण्याच्या हेतूने जिल्ह्यात निक्षय मित्र जोडणी अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी या स्वतः निक्षय मित्र झाल्या असून, क्षयरूग्णांच्या सहकार्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींनी निक्षय मित्र व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

उपक्रमात नव्याने 11 निक्षय मित्राची नोंदणी झाली  आहे. त्यानुसार 22 क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी दिली,

निक्षय मित्र संकल्पनेबाबत…

केंद्र शासनाने सन 2025 पर्यंत टीबीमुक्त भारत निर्माण करण्याचे धोरण आखले आहे. क्षय रुग्णांना सामुदायिक सहाय्य मिळण्यासाठी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. निक्षयमित्र उपक्रमांद्वारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळते. समाजातील कोणतीही व्यक्ती, सेवाभावी संस्था, व्यावसायिक संस्था, लोकप्रतिनिधी आदी सहभागी होऊन रुग्णांना मदत करू शकतात.

कसे व्हाल निक्षयमित्र

निक्षय मित्र होण्यासाठी लिंक https://reports.nikshay.in/FormIO/DonorRegistration वर जाऊन नोंदणी करावी किंवा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांना या 8421085368 मोबाईल क्रमांक वर संपर्क करावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज