आत्महत्या प्रतिबंध उपायांबाबत स्त्री रुग्णालयात चर्चा

 आत्महत्या प्रतिबंध उपायांबाबत स्त्री रुग्णालयात चर्चा  

अकोला,दिनांक १८ : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय कार्यक्रम नुकताच झाला. त्यात आत्महत्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

निराशा, अपयश यामुळे निर्माण होणारी आत्महत्येची भावना तसेच वेगवेगळ्या मोबाईल गेम्समुळे वर्तनात होणारे बदल, वाढते कौटुंबिक कलह आदी विविध बाबीं मानसिक आरोग्यावर परिणाम करतात, असे तज्ज्ञ डॉ. वंदना पटोकार यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षण केंद्रातील मुलींनी 'आत्महत्या प्रतिबंध' बाबत पथनाट्य सादर करून आत्महत्या व त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत महत्व सांगितले.

  वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्लम शेख, दंत शल्यचिकित्सक डॉ. मंगेश दातीर व वैद्यकीय अधिकारी डॉ. पोहुणीकर, मेटर्न श्रीमती कदम व परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जाधव व आभार सोपान अंभोरे यांनी मानले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व नर्सिंग शाळेतील विद्यार्थी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

०००

 

                                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज