प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ


 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण
जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

अकोला, दि. 20 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातील केंद्रांच्या लोकार्पणाचा मुख्य कार्यक्रम वर्धा येथे झाला. अकोला जिल्ह्यात १४ महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ कार्यक्रम श्रीमती मेहरबानु विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत झाला.
जिल्हास्तरीय कार्यक्रमाला आमदार वसंत खंडेलवाल, संस्थेचे अध्यक्ष दीपेन शहा, सचिव नरेंद्र पटेल, कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके,  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता शिंगरूप, उपप्राचार्य डॉ. मयूर मालवीया आदी उपस्थित होते. वर्धा येथील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात करण्यात आले.
कौशल्य विकास केंद्रे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक - जिल्हाधिकारी
कोणत्याही क्षेत्रात काम करताना प्रगतीसाठी कौशल्य आवश्यक असते. कार्यरत असताना अद्ययावत ज्ञान आत्मसात करत राहणे ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे माध्यमांत वैविध्य व विस्तार झाला आहे. हे बदल आत्मसात करून त्याचा कामात वापर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी सांगितले.
वर्धा येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्य शासनाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमीपूजनही यावेळी झाले. श्री. शेळके यांनी प्रास्ताविक केले.                                                    

   जिल्ह्यातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे
अकोला येथील श्रीमती महेरबानू कॉलेज, श्रीमती. राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, मांगीलालजी शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता व समाजकार्य महाविद्यालय आणि गुरुकृपा महाविद्यालय, त्याचप्रमाणे कान्हेरी सरप येथील श्रीमती कमलाबाई देशमुख महाविद्यालय, गाडेगाव येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, हिंगणा म्हैसपूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई दामोदर नेरकर कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाडेगावचे, श्री जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय व एल. एन. कला महाविद्यालय, महान येथील मनोहर नाईक कॉलेज, मूर्तिजापूर येथील जय हिंद महाविद्यालय, आणि मुंडगाव येथील कै. दादासाहेब देशमुख कॉलेज ऑफ डिप्लोमा इन लाइव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन.  
000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज