पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देशप्रोत्साहनपर लाभ योजनेत तक्रार निवारण शिबिराचे आयोजन
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
प्रोत्साहनपर लाभ योजनेत तक्रार निवारण शिबिराचे आयोजन
अकोला, दि. 24 : महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांच्या निर्देशान्वये सहकार विभागातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महात्मा
ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर लाभ योजनेत उद्यापासून (दि. 25) शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ योजनेत लाभ न मिळालेल्या अर्जदारांच्या
तक्रारींचे निवारण करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी रविवारी
झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सहायक
निबंधक कार्यालयात दि. 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत
तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन उपनिबंधक
डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.
शासन निर्णयान्वये, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर
लाभासाठी 2017-18, 20218-19 आणि 20219-2020 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षात पीक
कर्ज घेऊन नियमित परतफेड केलेली असणे आवश्यक आहे. दि. 1.4.2015 ते 31.3.2019 पर्यंत
उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्जाची दि. 30.9.2019
रोजी मुद्दल व व्याजासह थकित परतफेड न झालेली रक्कम 2 लाखांपर्यंत असल्यास अशा शेतक-यांचे
अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात
कर्जमुक्तीचा लाभ देता येईल, अशी पात्रता आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा