गत खरीपातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना आर्थिक सहाय्य

 

 

गत खरीपातील कापूस व सोयाबीन

उत्पादकांना आर्थिक सहाय्य  

अकोला, दि. २४ : कृषी विभागाने २०२३ च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पात्र शेतक-यांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून, संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे कृषी सहायकाकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

पात्र शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी १ हजार रू. आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर ५ हजार रू. अर्थसाह्य मिळणार आहे. गत हंगामात ई- पीक पाहणी, अॅप, पोर्टलद्वारे लागवडीची नोंद केलेल्या नोंदणीकृत शेतक-यांनाच हे अर्थसाह्य मिळेल. ही योजना केवळ  2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित आहे.

 

पात्र असलेल्या वैयक्तिक खातेदारांनी आधारपत्राची स्वसाक्षांकित छायांकित प्रत, संमतीपत्र व मोबाईल क्रमांक आदी माहिती जमा करावी, त्याचप्रमाणे, संयुक्त खातेदारांनी आधारपत्राची स्वसाक्षांकित छायांकित प्रत, संमतीपत्र, सामूहिक खातेदार नाहरकत प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक माहिती जमा करावी. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

0000

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम