महिला होमगार्डसाठी 4 सप्टेंबरला सदस्य नोंदणी

 

महिला होमगार्डसाठी 4 सप्टेंबरला सदस्य नोंदणी

अकोला, दि. 2 : सततच्या पावसाने जिल्हा होमगार्डसाठी महिला सदस्यांच्या नोंदणीची तारीख पुढे ढकलण्यात आली. सुधारित तारखेनुसार आता महिला उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी दि. 4 सप्टेंबर रोजी होणार आहे.

 

त्यासाठी महिला उमेदवारांना लक्झरी बसस्थानकाजवळच्या पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 5 वा. उपस्थित राहण्याच्या सूचना आहेत. अतिवृष्टीमुळे किंवा प्रशासकीय कारणास्तव चाचणीच्या तारखेत यापुढेही बदल होण्याची शक्यता नाकाराता येत नाही. तसे झाल्यास त्याची सूचना maharashtracdhg.gov.in/mahahg या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी या संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत राहण्याचे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज