आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी विशेष प्रशिक्षण सत्रात निर्देश



 

 

 

आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी

विशेष प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिका-यांचे निर्देश

अकोला, दि. 12 ; नागरिक व प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा आपले सरकार 2.0 पोर्टलची हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले

जिल्हा प्रशासनातर्फे नियोजनभवनात सोमवारी हे प्रशिक्षण सत्र झाले. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, ई- गर्व्हनन्स तज्ज्ञ देवांग दवे,  तांत्रिक तज्ज्ञ हर्षल मंत्री , शुभम पै, विनोद वर्मा, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी, तसेच प्रशासनाकडून गतीने तक्रारीचे निवारण व्हावे यासाठी आपले सरकार 2.0 पोर्टल कार्य करते. प्रणालीत प्रत्येक तक्रारीचे ट्रॅकिंग आणि निराकरण होते. प्रक्रियेला गती येते व नागरिकांचा वेळ वाचतो. सर्व विभागांनी या माध्यमातून प्रलंबित तक्रारींचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

या पोर्टलमुळे सार्वजनिक तक्रारींचे कार्यक्षम व्यवस्थापन होते. डेटा विश्लेषणाची सुविधा असल्याने पुनरावृत्ती होत असलेल्या समस्यांची जाणीव होते व त्या दूर करण्यासाठी दिशा मिळते. या प्रणालीद्वारे मासिक पुनरावलोकन करण्यात येणार असून, सर्वांनी विहित कार्यवाही पार पाडण्याचे आवाहन तज्ज्ञांनी यावेळी केले.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज