गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल

 

 

गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल

अकोला, दि. 5 : गणेशोत्सवानिमित्त शहर व जिल्ह्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तसा आदेश जारी केला.

 

आदेशाप्रमाणे, दि. 17 सप्टेंबर रोजी अकोला शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक सकाळी 6 वा. पासून दुस-या दिवशी स. 6 पर्यंत, अकोला- अकोट राज्य मार्गावरील वाहतूक सकाळी 6 पासून दुस-या दिवशी दु. 12 पर्यंत आणि अकोला- पारस फाटा ते बाळापूर मार्गावरील वाहतूक सकाळी 6 पासून दुस-या दिवशी दु. 12 पर्यंत वळविण्यात येईल.

पर्यायी मार्ग

डाबकी रस्ता, जुन्या शहराकडून विठ्ठल मंदिर, कोतवाली चौक मार्गे बसस्थानकाकडे येणारी आणि डाबकी रस्त्याकडून भीमनगर, मामा बेकरीकडे येणारी वाहतूक या कालावधीत भांडपुरा चौक- पोळा चौक- हरिहरपेठ- वाशिम बायपास चौक- हायवेवरून लक्झरी बसस्थानक ते अशोक वाटिका व अकोला बसस्थानकाकडे वळविण्यात येईल.

अकोला बसस्थानकाकडून हरिहरपेठेकडे जाण्यासाठी अशोक वाटिका- लक्झरी बसस्थानक- वाशिम बायपास असा मार्ग असेल. रेल्वे ओव्हर ब्रिजकडून कोतवाली चौकातून लक्झरी बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक रेल्वे स्थानक चौकाकडून अग्रसेन चौकातून उड्डाण पुलावरून जेल चौक व लक्झरी बसस्थानकाकडे वळविण्यात येईल.

लक्झरी बसस्थानकाकडून अकोट स्टॅंडकडे जाण्यासाठी जेल चौक- उड्डाण पुलावरून जावे लागेल. सुभाष चौकाकडून गांधी चौकाकडे जाण्यासाठी दामले चौकाकडून टॉवर चौक व अंडरपासमधून जावे लागेल.

अकोला- अकोट मार्गावरील वाहतूक

अकोट ते अकोला मार्गावरील वाहतूक अकोला बसस्थानकापासन अशोक वाटिकेवरून वाशिम बायपास- शेगाव टी पॉईंट- गायगाव- देवरी अशी वळविण्यात येईल. अकोल्यावरून म्हैसांग, दर्यापूरकडे जाणारी वाहतूक टॉवर चौकातून रेल्वेस्थानक- सातव चौक मार्गे न्यू तापडियानगर, खरप टी पॉईंटवरून म्हैसांग अशी वळविण्यात येईल.

पारस फाटा- बाळापूर- खामगाव मार्गावरील वाहतूक

अकोल्याहून पारस फाटा- बाळापूरकडे जाणारी वाहतूक हायवे ट्रॅप कार्यालयाकडून वळविण्यात येईल. खामगावकडून पारस फाटा- बाळापूर- पातूरकडे जाणारी वाहतूक खामगाव- पारस फाटा- वाशिम बायपास चौक- पातूर याचमार्गे वळविण्यात येईल. अकोला- पारस फाटा मार्गे खामगावकडे जाणारी वाहतूक अकोला- पारस फाट्याजवळील रोशन ढाब्याजवळून वळवून खामगाव ते अकोला मार्गावरील तपे हनुमान मंदिराजवळील डिव्हायडर बॅरिकेटिंगपर्यंत वळविण्यात येईल. या बदलानुसार नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज