शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 










अकोला, दि. २२ : सततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील शिवापूर येथे शेसततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला तालुक्यातील शिवापूर येथे शेतीची पाहणी केली.


खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह महसूल, कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी शिवापूर येथील शेतकरी गजानन जळमकार यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केली व गावातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली.

शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम