राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २६ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


अकोलादि १३: पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने भटक्या जमाती - क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्हातील भज-क  प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थीसाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे ऑनलाईन अर्ज दि. २६ सप्टेंबर पर्यंत मागविण्यात येत आहेत.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप. सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप.मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान. पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान देण्यात येणारं आहे.

ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन आहेअशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६ हजार प्रमाणे  एकूण २४ हजार चराई अनुदान वाटप.तर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपना साठी कमाल रु. ९ हजार रुपयांच्या मर्यादेत ७५% अनुदान देण्यात येणार आहे.

राज्यातील भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंदिस्तबंदिस्त मेंढी-शेळी पालनाकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या ७५% (अधिकतम रु. ५०,०००/-) अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाडयापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या ७५% रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणुन कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदाना अंतर्गत देण्यात येणारं असून  योजनेकरिता अर्ज (www.mahamesh.orgया संकेतस्थळावर करावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद) कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज