डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना इच्छूक संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा आरडीसी विजय पाटील यांचे आवाहन

 

डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना

इच्छूक संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा

आरडीसी विजय पाटील यांचे आवाहन

अकोला, दि.५ : अल्पसंख्यांक विभागाच्या डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक संस्थांनी दि. 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

या योजनेत ज्या मदरश्यांमध्ये फक्त पारंपरिक धार्मिक शिक्षण देण्यात येते अशा आधुनिक शिक्षणासाठी शासकीय अनुदान घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मदरशांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर मदरसे चालवणाऱ्या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, इच्छुक मदरशांनी विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पसंख्याक शाखेत १५ सप्टेंबरपर्यंत दोन प्रतीत सादर करावा. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

योजनेत विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्याकरिता शिक्षकांना मानधन, पायाभूत सुविधांसाठी व ग्रंथालयांसाठी अनुदान, मदरशांमध्ये राहून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्यासाठी पहिल्यांदा ५० हजार रुपये व त्यानंतर प्रतिवर्षी ५ हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधांसाठी २ लक्ष अनुदान देय आहे.  जास्तीत जास्त ३ डीएड, बीएड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. त्यासाठी भाषेचे माध्यम निवड करून शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ज्या मदरशांना केंद्र शासनाच्या ‘एसपीक्यूईएम’ या योजनेचा लाभ मिळाला असेल अशा मदरशांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जाचा नमुना आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम