अकोला पश्चिम मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

 

अकोला पश्चिम मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

अकोला, दि. 6 : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी 307 मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी यादीत आपल्या नावाची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांनी केले आहे.

यादीनुसार, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 1 लाख 72 हजार 840 पुरूष, 1 लाख 72 हजार 587 महिला व म 23 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 45 हजार 450 मतदार आहेत. पुनरीक्षणानुसार 8 हजार 678 नवीन मतदारांची नोंदणी झाली, तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मयत अशा 1 हजार 684 मतदारांची नावे वगळण्यात आली.

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळ व ॲपवरही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा