मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँक खाते आधार सीडिंग करून घ्यावे - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना


 बँक खाते आधार सीडिंग करून घ्यावे


- जिल्हाधिकारी अजित कुंभार




अकोला, दि. २३ : जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांनी अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सीडेड आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याला आधार सिडिंग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सिडींग करून घ्यावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.


 डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. ऑनलाईन  अर्ज केलेल्या पात्र लाभार्थींना डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यात  लाभ जमा होणार आहे. तेव्हा लाभार्थ्यांनी  आधार सिडिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम