डॉ. पं. दे. कृ. वि व कृषी विभागाचा उपक्रम; शिवारफेरी-२०२४ व चर्चासत्राचा समारोप शेतकऱ्याला परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील -












अकोलादि. २२ : ज्ञान व संशोधन केवळ चार भिंतीत न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी शिवार फेरीसारखा उपक्रम स्तुत्य आहे. अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवावी. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन नवसंशोधनाला चालना द्यावी आणि शेतकऱ्याला परवडेल असे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावेअसे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आयोजित अकोला येथे शिवार फेरी व चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. 

पालकमंत्री श्री  विखे पाटील यांनी प्रारंभी श्रीमती शालिनीताई विखे पाटील यांच्यासह शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली.

खासदार अनुप धोत्रेआमदार रणधीर सावरकर,आमदार प्रकाश भारसाकळेआमदार हरीश पिंपळेआमदार वसंत खंडेलवालआमदार अमोल मिटकरीकार्यकारी समितीचे सदस्य विठ्ठल सरप पाटीलहेमलता अंधारे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाखजिल्हाधिकारी अजित कुंभारजि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवीपोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीशेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याचे जीवनात परिवर्तन करण्यासाठी त्याला परवडेल असे तंत्रज्ञानसाधने मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाने नवसंशोधनाला चालना द्यावी. कृषी विज्ञान केंद्रे ही संशोधनाची रोल मॉडेल व्हावीत. शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा व्यापकपणे वापर करावा. पॉलीहाऊससारखे तंत्रज्ञान गरजूंपर्यंत पोहोचले पाहिजे.

ते पुढे म्हणाले कीदुग्ध उत्पादनात विदर्भ मागे असल्याचे लक्षात घेऊन शासनाकडून 19 जिल्ह्यांमध्ये विशेष योजना राबविण्यात येत आहे. विदर्भ दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावा असा प्रयत्न आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून गावोगाव दूध संकलन केंद्रे निर्माण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील पशुधनतेथील दुग्धोत्पादनअडचणी आदींबाबत सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. शिवार फेरीचा उपक्रम कौतुकास्पद असूनत्याची व्याप्ती वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पशुवैद्यकीय महाविद्यालय, 37 तलाठी व 12 मंडळ कार्यालयासाठी निधी मंजूर झाल्याचे आमदार श्री. सावरकर यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. गडाख यांनी शिवार फेरी व विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम