कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचे- अजित कुंभार पोषण महा निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पोषण जनजागृती प्रदर्शनी

 








अकोला, दि 10 : कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचा टप्पा ठरणार असून जिल्हाभरात पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.

महिला व बालकल्याण विभाग तथा एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या वतीने नियोजन भवन परिसरात राष्ट्रीय पोषण अभियान व पोषण महानिमित्त पोषण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रदर्शनीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी राजश्री कोलखेडे व एकात्मिक बाल विकास सेवा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

पोषण प्रदर्शनीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा तेल्हारा विभागाच्या वतीने पोषणासाठी महत्त्वपूर्ण असणारे घटक, एक पेड मा के नाम, मी  आहे पोषण मटका, स्तनपान जनजागृती यासह विविध संदेश साकारण्यात आले होते यासह विविध संदेश साकारण्यात आले होते.1 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण महा साजरा केला जात असून राष्ट्रीय पोषण अभियानाच्या माध्यमातून कुपोषणाची पातळी कमी करणे आणि देशातील मुलांचा पोषण दर्जा हे उदिष्ट ठेवून 0 ते 6 वयोगटातील मुले,गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांचे पोषण परिणाम सुधारण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्वाचे पाऊल ठरत आहे.

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज